नमस्कार,
अनवट वाटेवर आपले सहर्ष स्वागत!
‘अनवट वाटा’ प्रामुख्याने मी केलेल्या भटकंतीचा लेखा जोखा असला तरी त्यामध्ये साहित्य, काव्य, विचारमंथन अश्या निरनिराळ्या अनवट वाटांवरची माझी मुशाफिरी देखील आहे. ह्या अनवट वाटेवर तुमची कधी भेट घडेल डोंगर माथ्यावरून नजरभेट झालेल्या सूर्योदयाशी, तर कधी समुद्र काठावरच्या सूर्यास्ताशी. कधी हिरव्या जंगल वाटा तर कधी शुभ्र चमचमती हिमशिखरे! अनेक निसर्गाचे अविष्कार भेटतील, कधी चित्रातून तर कधी शब्दातून!
अनवट वाटेवर माझी प्रवास वर्णने, पदभ्रमण मोहिमा, भटकंती, कविता आणि इतर बरेच काही तुम्हाला वाचता येईल.
तुमचा माझ्या अनवट वाटेवरचा वाचन प्रवास आनंददायी होवो!
Latest Posts

‘हिमालयातील अनवट वाटा’ हे पुस्तक म्हणजे हिमाचल प्रदेश, गढवाल, कुमाऊ, पूर्व हिमालय ह्या प्रदेशांमध्ये दुर्गम हिमालयात केलेल्या पाच पदभ्रमण मोहिमांच्या स्वानुभवांचे शब्दांकन आहे. ज्यांना पर्यटन, ट्रेकिंग ह्याची आवड आहे, तसेच हिमालयाची ओढ आहे, त्यांना हे अनुभव कथन वाचण्यास नक्की आवडेल. पुस्तक खरेदीसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या.



















