भटकंती

आदि कैलाश – ॐ पर्वत यात्रा भाग – १

भारताच्या उत्तराखंड राज्यातील पिथौरागढ जिल्ह्यात हिमालयीन पर्वतरांगेत स्थित आदि कैलास किंवा ‘छोटा कैलाश’ म्हणजे तिबेटमध्ये असलेल्या कैलास पर्वतशिखराचे प्रतिरूप! पंच कैलाशांपैकी एक “आदि कैलाश”!

जागेश्वर मंदिर समूह

घनदाट देवदार वृक्षाच्या जंगलांनी वेढलेल्या हिरव्यागार टेकड्यांच्या परिसरात वर्षभर सुखद हवामानाचा वरदहस्त असलेले एक प्रसिद्ध आणि प्राचीन तीर्थस्थळ म्हणजे - जागेश्वर धाम! इथे भगवान शिवाला समर्पित १२५ पेक्षा अधिक प्राचीन दगडी मंदिराचे दोन ऐतिहासिक समूह आहेत. ही मंदिरे म्हणजे दगडात कोरलेली एक अखंड शिवनगरी जणू! ही मंदिरे त्या निसर्गरम्य वातावरणात त्यांच्या रचनेतून भारताच्या समृद्ध स्थापत्य कलेची अद्वितीय परंपरा आपल्यासमोर उलगडतात.

आठवणीतले नैनीताल

एप्रिल १९९७ च्या नैनीताल सहलीची आठवण आजही मनात ताजी आहे. हिमालयीन हवेची सुखद झुळूक, डोंगररांगांच्या कुशीतून चमकणाऱ्या चांदण्या, आणि सकाळी बाल्कनीतून दिसणारे शांत नैनी सरोवर—सगळेच जादुई! गुलाबी थंडीत आयता चहाचा कप आणि जोडीला निसर्गाचा देखावा! हे क्षण आजही बंद पापण्यांसमोर नैनीतालच्या हिमालयीन सौंदर्याची आठवण करून देतात. नैनीलेकवरील बोटींग, स्नो-व्ह्यू पॉइंटची सफर, आणि मॉल रोडवरील संध्याकाळचा फेरफटका—नैनीताल म्हणजे खरोखर कुमाऊंची राणी! .

सिक्कीम डायरिज् : अंतिम भाग

सिक्कीम म्हणजे निसर्गसंपन्न हिमालयाच्या कुशीत वसलेली, आपला ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारी शहरे! सिक्कीम म्हणजे शांत दऱ्या-खोऱ्यांमध्ये “ओम मणि पदमे हम्” चा नाद करीत फडफडणारे  रंगीत प्रार्थना ध्वज आणि सुंदर आणि पवित्र बुद्ध विहार! सिक्कीम म्हणजे चहाच्या मळ्याचा सुगंध, ढगांच्या कुशीत हरवलेल्या हिरव्यागार टेकड्या आणि त्यांच्या मागे स्थितप्रज्ञासारख्या अविरत उभ्या हिमालयाच्या पर्वतरांगा!  

सिक्किम डायरीज् : भाग ५ –

गुरुडोंगमार सरोवराची धवल रंगात मिसळलेली आकाशाची निळाई, लाचेन-लाचुंगच्या शांत दऱ्यांमधून पसरणारा सकाळचा धूसर प्रकाश, तितकीच तेथील साधी, उबदार माणसं! हे सगळं काही आपल्या मनात घर करून राहतं! लाचेन-लाचुंगच्या प्रवासात जाणवतं की, नॉर्थ सिक्किम हे केवळ एक पर्यटन स्थळ नाही, तर एक अनुभव आहे!

विरहिणी

एका संवेदनशील मनाची त्याच्या जीवनाशी चाललेल्या संवादाची काव्यरूपी नोंद! दु:ख, धडपड, प्रेम, ध्येय, कर्तव्य—सगळं एकत्रित गुंफण्याचा एक प्रयत्न!

सिक्कीम डायरीज् : भाग ४

कांचनजंगा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य गंगटोक हे आधुनिकता आणि निसर्ग ह्या दोन्हींचे अनोखे मिश्रण आहे. हिमाच्छादित पर्वतशिखरांचे दर्शन, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करणारे बौद्ध विहार, सर्व दूर फडफडणारे रंगीबेरंगी प्रार्थना ध्वज, आधुनिकतेची झलक यामुळे गंगटोकची भटकंती एक आगळा वेगळा अनुभव देऊन जाते. एम.जी. रोडवरील नाताळची संध्याकाळ, ताशी व्ह्यू पॉईंटवरून दिसणारे हिमालयाचे भव्य दर्शन आणि रुमटेक मठातील अध्यात्मिक शांतता – ह्यामुळे गंगटोकची नाताळ सफर अविस्मरणीय झाली!

सिक्कीम डायरीज् : भाग – ३

रावंगला आणि नामची - निसर्ग आणि संस्कृतीचा अनोखा अनुभव!

सिक्कीम डायरीज् : भाग – २  

योकसुम म्हणजे सुंदर निसर्गासोबत अध्यात्मिक आणि ऐतिहासिक ओळख असणारे अत्यंत शांत आणि विलक्षण नयनरम्य गाव! योकसुम म्हणजे अस्मानाला गवसणी घालणाऱ्या गिरिशिखरांशी नजरेनेच गुजगोष्टी करत कांचनजंगा पर्वतांच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलांच्या दरवळामध्ये स्वत:ला हरवून जाणं! निसर्गरम्य योकसुमच्या नीरव शांततेत काळ मंदावल्यासारखा वाटतो. आपल्या शरीराला स्पर्शून जाणाऱ्या त्या हवेत प्राचीन राजांच्या कथा, थेट भगवंताला साद घालणारी प्रार्थना ध्वजांची फडफड, आणि सभोवार पर्वतांचे शाश्वत नृत्य आपल्या कानामध्ये गुंजत राहते!

सिक्कीम डायरीज् : भाग – १  

भारताच्या ईशान्येला पूर्व हिमालयाच्या कुशीत अगदी आपले वेगळेपण राखून असणारे आणि भारताच्या सर्वात लहान राज्यांमध्ये दुसरा क्रमांक असणारे राज्य म्हणजे सिक्कीम! समुद्र सपाटीपासून ७०५० फूट उंचीवर असलेल्या  ग्यालशिंग शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर एक लहान निसर्ग सौंदर्याने नखशिखांत नटलेले शहर वजा गाव म्हणजे पेलिंग! कांचनजंगेच्या थेट मनोरम दृष्टादृष्ट भेटीसाठी परिचित असलेले आणि सिक्किममधे होत असलेल्या अनेक पदभ्रमण मोहिमांचा पहिला टप्पा म्हणजे पेलिंग.

मिरीक – छोटेखानी निसर्गरम्य शहर

पश्चिम बंगालमधील लोकांसाठी दार्जिलिंग जिल्ह्यातील अगदी हिमालयाच्या पायथ्याशी असलेले जवळचे थंड हवेचे, खूप कोलाहल नसलेले एक नयनरम्य पर्यटन स्थळ म्हणजे – मिरिक! आल्हाददायक हवा, दूरवर नजरेस पडणाऱ्या शुभ्र हिमालयीन पर्वतरांगा, उंच टेकाडांवर पसरलेले चहाचे मळे आणि शांत वातावरणामुळे मिरिक हे एक निवांत सुट्टीचे ठिकाण आहे!  

एक अविस्मरणीय अनुभव- ओरिसा, पश्चिम बंगाल आणि नेपाळ सहल

नमस्कार, पंचवीस वर्षापूर्वी केसरी टुर्स सोबत केलेल्या एका प्रवासाचे टिपण जाणीवपूर्वक जसेच्या तसे आज कोणताही फोटो न वापरता पोस्ट करीत आहे. तुम्हाला आवडले तर जरूर प्रतिक्रिया नमूद करा! गोष्ट आहे सन २००० च्या वर्षातली! नेहमी प्रमाणे कौटुंबिक सहलीची आखणी झालेली होती. हया सुट्टीचा कार्यक्रम काहीसा मोठा होता! मुंबईहून ओरिसा राज्यातील भूवनेश्वर,जगन्नाथपूरी, कोणार्क सूर्य मंदिर पाहून पश्चिम बंगाल मधील कलकत्ता-दार्जिलिंग मार्गे जायचं ठरलं होतं- एकमेव हिंदू राष्ट्राच्या भेटीसाठी - अर्थातच कांचनजंगेच्या कुशीतील-नेपाळ!

पृष्ठे: 1 2 3 4 5

उत्तराखंडचे मिनी स्वित्झर्लंड

उत्तराखंड राज्य निसर्ग सौंदर्याने पुरेपूर नटलेले आहे. उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात नैसर्गिक सौंदर्याने नटलेले एक हिल स्टेशन आहे- हर्षिल! बर्फाच्छादित पर्वत, पाईन वृक्षांची जंगले, सफरचंदांच्या बागा, प्राचीन मंदिरे, पारंपारिक लाकडी घरे हयांनी नटलेले हर्षिल, उत्तराखंड मधील “मिनी स्वित्झर्लंड” म्हणूनही ओळखले जाते.

गरतांग गली

उत्तरकाशी जिल्ह्यातील नेलोंग व्हॅलीतील उंच डोंगर-कपारीमध्ये असलेला हा ऐतिहासिक लाकडी पूल, “गरतांग  गली” म्हणून प्रसिद्ध आहे. निखळ डोंगर खडकांमध्ये कोरून बनवलेला हा पूल म्हणजे अभियांत्रिकी आणि सांस्कृतिक वारसाचा एक उल्लेखनीय नमूना आहे. जणू डोंगराच्या पोटात पोखरून तरंगता पूल बनवलेला आहे! हा छोटासा ट्रेक जितका थरारक आहे तितकाच निसर्गरम्य!

गौमुख – तपोवन

गौमुख-तपोवनाकडे जाताना अगदी रूक्ष, खडकाळ वाटणारा हा प्रदेश, परतीच्या प्रवासात मात्र गंगा अवतरणाच्या पौराणिक कथेचा रंगमंच भासू लागला. विधात्याने निसर्गाचे नेपथ्य इतके बेमालूम निर्माण केलेले होते की, गंगा अवतरणाच्या कथेचा प्रत्येक प्रसंग खरा वाटावा! शिवलिंग पर्वत स्वरूप महादेव आणि तिथून उत्पन्न होणारी आकाशगंगा! गौमुखातून उगम पावणारी भागीरथी! त्या गूढ शांततेचा आणि हिमाच्छादित पर्वत शिखरांनी वेढलेला सामान्यतः रुक्ष वाटणारा प्रदेशही सुंदर वाटू लागतो. पौराणिक दंतकथेने मनावर गारुड करून संमोहित केल्यासारखी भावना होऊ लागली! ट्रेकचा बहुतांशी टप्पा हा अगदी रांगड्या वाटणाऱ्या निसर्गाशी थेट भेट घडवून आणणारा आहे. प्राचीन पौराणिक कथेशी संदर्भ जोडणाऱ्या हिमशिखरांनी सजलेल्या चौफेर वेढलेल्या पर्वत रांगा गूढ रहस्य दडविल्यागत आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या असतात आणि अवघा गौमुख तपोवनाचा मार्ग आपल्याला प्राचीन दंतकथा आणि जादुई सौंदर्याचा ट्रेक भासू लागतो!

हिमाचलचे निसर्ग वैभव – तीर्थन आणि सेंज व्हॅली!

कुल्लू जिल्ह्यामध्ये दुर्गम हिमाचलामध्ये जणू दडून बसलेली तीर्थन व्हॅली, जीभी व्हॅली आणि सेंज व्हॅली ही खोरी निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण आहेत. विस्तीर्ण पसरलेली मखमली कुरणे, त्यांच्या सभोवताल, कोनिफरस वृक्षांची लगट! एका मागोमाग हिरवट, निळसर आणि करड्या होत जाणाऱ्या डोंगर रांगा! आणि त्यांच्या मागे दंतूर पंक्तिसारख्या डोकावणाऱ्या हिमाच्छादित पर्वतरांगा! निळ्या आकाशी पांढऱ्या, भुरक्या, करड्या तर कधी गडद निळ्या ढगांचा चालणारा खेळ आणि त्यांच्या त्या पर्वतरांगांवर झुलणाऱ्या सावल्या! सारं काही अगदी अद्भुत आणि परिकथेतील गोष्टी सारखं!

पृष्ठे: 1 2 3 4

दुर्ग कलावंतीण

मुंबई-पुणे महामार्गावरून जाताना डाव्या हाताला इंग्रजी “व्ही” आकार धारण करणाऱ्या ह्या पर्वत रांगांची नजरभेट किती वेळा झाली असेल ह्याची मोजदाद नाही. पुण्याला अथवा खालापूर-कर्जतकडे जाताना असंख्यवेळा ह्या डोंगररांगा नजरेला भिडलेल्या! पावसाळ्यात हिरवाईने नटलेल्या, तर एरवी करड्या रंगाची प्रावरणे धारण करून सदैव ठाम उभ्या असलेल्या ह्या पर्वतरांगा परिचयाच्या होत्या खऱ्या! परंतु हया पर्वतरांगामध्ये ‘दुर्ग’ म्हणण्या इतके सह्याद्री वैभव दडलेले असेल ह्याची अजिबात कल्पना नव्हती. कलावंतीण दुर्ग म्हणजे महाराष्ट्रातील पश्चिम घाटात सह्याद्री पर्वतरांगांमध्ये, रायगड जिल्ह्यामधील पनवेलच्या पूर्वेला मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून माथेरानच्या डोंगररांगामध्ये दिसणारे, समुद्र सपाटीपासून अंदाजे २२५० फूट उंचीचे एक छोटे शिखर!

यात्रा केदारखंडाची

महाकवी कालिदासाने हिमालयाला देवतात्मा अशी उपमा दिली आहे. अश्या ह्या देवतात्मा हिमालयाच्या कुशीत वसलेले उत्तराखंड राज्य! हिमालयाच्या पांच खंडामधील एक केदारखंड! हेच केदारखंड आज उत्तराखंड राज्यामधील गढवाल मंडल म्हणून परिचित आहे. ह्याच गढवाल भूमीत सुमेरु, सतोपंथ, गौरीपर्वत, गंधमादन, स्वर्गारोहिणी, केदारकंठा, बंदरपुंछ, नीलकंठ, चौखम्बा आदि पर्वतश्रेण्या आणि अनादि काळापासून भारतीय संस्कृतीला वंदनीय-पूजनीय असणारे, अखंड भारतवर्षाला सुजलाम-सुफलाम करत निरंतर प्रवाही असणारे गंगा-यमुनेचे जलप्रवाह! अनेकानेक तीर्थस्थळे, मनमोहक निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असणाऱ्या ह्या हिमालयात प्रवेश करताच खरोखर देवभूमीतच आल्याचा आभास होतो. गढवाल हिमालयात होणारी चारधाम यात्रा ही आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याची आणि हृदयाजवळची गोष्ट!

पृष्ठे: 1 2 3 4 5

किल्ले हातगडसह सापुतारा

महाराष्ट्र हा खरं तर गडकिल्ल्यांचाच प्रदेश! नाशिक जिल्ह्यामध्ये सुरगणा नावाचे तालुक्याचे गाव आहे. सह्याद्रीच्या पूर्व भागातील “सातमाळ” पर्वतरांगांची सुरुवात ह्याच तालुक्यापासून होते. ह्याच रांगेच्या उपशाखेवर हा छोटासा किल्ला आहे – हातगड !

कवितेतला पाऊस

पाऊस! तुमच्या आमच्या मनातला, मृदगंध पसरविणारा! कधी चिंब भिजवणारा, तर कधी हसवणारा, कधी आतुरतेने वाट पहायला लावणारा तर कधी आगंतुकासारखा बरसणारा! मला असा कधी कवितेतून भेटलेला!

Create a website or blog at WordPress.com

Up ↑