भटकंती

रम्य सरोवरांच्या प्रदेशात- भाग ७

हिरव्यागार कुरणामधून धुक्याचा गडद अंचल ओढून लाजत मुरडत जणू अवनी आमच्या स्वागतास अवतरली होती. सातसार कॅम्पहून निघाल्यापासूनची चढउतारांवर झालेली दमछाक पार नाहीशी झाली. अतिशय विलक्षण सुंदर निसर्गाचा आविष्कार होता! आम्ही क्षणभर ‘गंगाबल’ सरोवराचा नजारा पाहून पाऊले आमच्या अगदी हाकेच्या टप्प्यात असणाऱ्या कॅम्पसाईटकडे वळविली. काही अंतर पुढे जाताच दृष्टीस पडले ‘नंदखोल’ सरोवर! ही जुळी सरोवरे अद्भुत निसर्ग सौंदर्याने अगदी हया हिमालयीन पर्वत रांगांच्या कुशीत स्वर्गीय सौंदर्याची अनुभूति देण्यासाठी विराजित होती जणू! त्यांचा पाठीराखा ‘हरमुख पर्वत’ काश्मीरी पंडितांसाठी अत्यंत पवित्र आणि धार्मिक महत्त्व असलेले स्थान! अमरनाथ गुंफेच्या व्यतिरिक्त भगवान शंकराशी निगडीत असलेलं काश्मीर खोऱ्यामधलं अजून एक ‘भक्ती स्थान’! हरमुख!

रम्य सरोवरांच्या प्रदेशात – भाग ६

पावलोपावली बालकवींची कविता जिवंत झाली होती! “हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे – त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती”. हिरवळीमधून जाणाऱ्या पायवाटा आणि स्वागतोत्सुक रंगीबेरंगी फुलांचे विखुरलेले गालिचे! उजव्या बाजूला पंजे रोवून उभे असल्यागत खडे पहाड आणि पायथ्याशी वाहणाऱ्या हिमनदया, त्यांच्या पासून निर्माण झालेल्या निर्झरांचे त्या दरी-खोऱ्यांमध्ये चालू असलेले अखंड पखवाज वादन, आणि आम्ही अगदी उंचीवर असूनही कानी पडणारे त्यांचे ध्रुपद-धमार! हिरवळीवर मुक्तपणे विहार करत खुशाल चरणारे पश्मीना मेंढ्यांचे कळप आणि निवांत त्यांच्या मागे असणारे बकरवाल! डोळे अगदी ३६० अंशाच्या कोनामध्ये फिरले तर स्तब्ध आणि थक्क करणारी निसर्ग चित्रे!

रम्य सरोवरांच्या प्रदेशात – भाग ५

गडसर खिंडीमध्ये पोहोचताच निसर्ग चित्रांचे जणू एक भव्य दालनच आपल्या पुढे उघडले आहे असे वाटू लागते. दोन्ही जुळ्या सरोवरांचे एकत्रित दर्शन भव्य दिव्य वाटते. इतक्या उंचीवर दुर्गम पर्वतरांगांमध्ये दडलेले हे निसर्ग वैभव आणि त्याच्या भव्यतेचा आविष्कार वेगळ्याच अनुभूति देऊन जातो.

रम्य सरोवरांच्या प्रदेशात – भाग ४

उंच आकाशाकडे नजर करताच कायम बर्फाच्छादित राहिल्यामुळे पार बोडक्या दिसणार्‍या कातीव कडेकपारी, त्यांच्या अंगाखांदयांवर झुलणारे हिम! आणि त्यांच्या पायाशी लडिवाळ नाद करीत प्रवाही झालेले झरे आणि मग त्यांच्या कुशीमध्ये जागोजाग पसरलेले हिरवळीचे गालिचे!

रम्य सरोवरांच्या प्रदेशात – भाग ३

आम्ही हिरव्यागार हरित तृणांच्या मखमालीने नटून थटून आमच्या स्वागतास सज्ज असलेल्या नागमोडी वळणे असलेल्या डोंगर उतारांवरुन पुढे चालू लागलो. जसजसे पुढे जात होत होतो तसतसे उंचीचे माप वाढत होते. मागे वळून पाहता विस्तीर्ण खोऱ्यात सोनामर्ग गाव आणि ताजिवास ग्लेशियर दिसत होते. त्याच्या पलीकडे दूर एकमेकांत पाय गुंतवून उभे असलेले ‘बलतल’ जवळचे पहाड दिसत होते. आणि त्याही पलीकडे ‘बर्फानी बाबा’ अमरनाथ पहाडाच्या गुंफेत हया वर्षी यात्रेकरूंच्या कोलाहलाविना ध्यानस्थ बसले असावेत!

रम्य सरोवरांच्या प्रदेशात – भाग २

सर्व दूर पसरलेली पाचूच्या रंगाची कुरणे, देवदार वृक्षांची जंगले आणि चंदेरी हिमाने नटलेली पर्वत शिखरे!

रातराणी

रात राणी फुलली, कळी कळी फुलली

शब्द

भावना व्यक्त होताना लेखणीतून शब्द जन्म घेतात. जणू मनाची स्पंदनं! जसं व्यक्त व्हाल तसा भाव! तर हे एक शब्द काव्य!

ध्यास

संघर्षाशिवाय ध्येय पूर्ती नाही! जीवनात लक्ष्य ही फार महत्वपूर्ण गोष्ट आहे. ध्यास हा हवाच!

मन माझे

आपल्या मनाचा ठाव आपल्यालाच कधी लागत नाही. कधी असं तर कधी तसं ! मानवी मनाची गती अनाकलनीय! "मन माझे" ह्या कवितेत माझं मन फुलपाखरू अलगद चिमटीत पकडण्याचा हा एक प्रयत्न!

पुष्पावती भेट

व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचा ट्रेक करून आल्यानंतर तेथील निसर्ग सौंदर्याने मनावर गारुड केले जणू! त्या अनुभवांना शब्द बद्ध करण्याचा हा एक प्रयत्न.

रम्य सरोवरांच्या प्रदेशात

पृथ्वी तलावर कुठे स्वर्गातील नयनरम्य असे नंदनवन असेल तर ते कश्मीर मध्येच वसलेले आहे! आणि हे नंदनवन जर अगदी खरोखर अनुभवायचे असेल तर कश्मिरच्या निसर्गरम्य दरी-खोऱ्यामध्ये भटकंती करायलाच हवी! हयाची प्रचीती कश्मीर खोऱ्यामध्ये विस्तीर्ण पसरलेल्या आणि अमर्याद निसर्ग सौंदर्याची उधळण झालेल्या हिमालयाच्या पर्वतरांगांमधून जाणारा “कश्मिर ग्रेट लेक”चा ट्रेक केल्यावर नक्कीच येते. असीम निसर्ग सौंदर्याचा वरदहस्त लाभलेल्या दरीखोऱ्या, रम्य अल्पाइन सरोवरे, त्यांच्या स्फटिकासम असणाऱ्या पाण्यामध्ये उमटलेल्या अनेक रंगछटा आणि सुविशाल हिमालय पर्वतांची छबी! सर्व काही मंत्रमुग्ध करणारं !

जय बर्फानी बाबा की!

पंचतरणीचा आसमंत अगदी चैतन्यस्वरूप वाटत होता. हयाच पंचतरणीपाशी महादेवाने पंचमहाभूताना त्यागले, तो परिसर एकाच वेळी आप, तेज, वायु आणि आकाश ह्यांची अनुभूति करून देत होता. निरभ्र आकाशात बर्फाच्छादित शिखरांवर पडलेली कोवळी सूर्यकिरणे विलोभनीय होती. पंचतरणीचे जल स्त्रोत त्या किरणांमुळे चमचमत होते. शीतल वायुलहरी पंचतरणीच्या खोऱ्यामध्ये खुशाल रेंगाळत होत्या.

पृष्ठे: 1 2 3 4 5 6

हर की दून – महादेवाच्या भूमीत!

हर की धून म्हणजे गिरी-राजशृंगी महादेवाचे व प्रकृती पार्वती-सतीचे मिलन! इथे आल्यावर असे वाटते की, हिमालयाचा विराट देह धारण करून पार्वती परमेश्वर दर्शनेच्छुंना विस्मय, भय अश्या दृष्यांची भेट घडवून संमिश्र आनंदाच्या उर्मीनी परिपूर्ण करीत आहेत. हिमालय जितका मनोरम तितकाच भयावह! हया परस्परविरोधी भावांचा एकत्र समावेश शिव-गौरीच्या हिमालयरूपी विराट देहातच प्रकट झालेला दिसून येतो.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑