मन माझे

मन फुलपाखरू भिरभिरे हवेत
आनंद परिमळ झुळझुळे हृदयात 
 
मन कधी मोगरा डोलतसे ताटव्यात
प्रेम सुगंधी दरवळे आसमंतात
 
मन कधी निर्झर खळाळत अव्याहत
उल्हास तुषार लयीवर फुलवित
 
मन जणु इंद्रधनु ल्यायले सप्तरंग
हृदय क्षितिजावर फुलवित रंग तरंग
 
मन अथांग सागर न कळे त्याचा ठाव
अंतरंगाचे डोही गुणावगुणाचे अनंत भाव
 

Discover more from अनवट वाटा

Subscribe to get the latest posts sent to your email.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Create a website or blog at WordPress.com

Up ↑