कुमाऊं प्रदेशातील अत्यंत दुर्गम भागात दारमा व्हॅलीसारखी नितांत निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असलेली अनेक सुंदर ठिकाणे आहेत. अत्यंत दुर्गम भागात असल्याने अद्यापही बहुतांशी लोकांना ही ठिकाणे अवगत नाहीत. पिथौरागढ जिल्ह्यात कुमाऊं हिमालयाच्या पूर्वेकडील कोपर्यात दोन पर्वतरांगांनी विभागलेल्या खोऱ्यांमध्ये ‘दारमा व्हॅली’ पसरलेली आहे. दारमा व्हॅलीचे प्रमुख आकर्षण म्हणजे पंचाचुली पर्वत शिखरे!
आदि कैलास – ॐ पर्वत यात्रा – भाग २
आदि कैलास आणि ॐ पर्वत ही केवळ हिमालयातील भव्य शिखरे नाहीत; ती अशी पवित्र स्थाने आहेत, जिथे निसर्ग स्वत:च शिवतत्त्वाचे साकार दर्शन घडवतो. आदि कैलास पर्वताच्या छायेत शांत उभं राहिल्यावर जाणवतं—शिव दूर कुठे नाही; तो इथेच आहे, या गिरीकंदरांमध्ये, ह्या आसमंतामध्ये, इथे वाहणार्या वाऱ्यात, इथल्या निळ्या आकाशात, आणि आपल्या श्वासाच्या लयीत! ॐ पर्वताच्या सान्निध्यात, नाबी डांगच्या नीरव शांततेत निसर्ग ध्यानस्थ होऊन मंत्रोच्चार करत त्या पर्वत शिखरावर ॐ रेखाटत आहे आणि त्याचा सूक्ष्म नाद कानात गुंजत आहे अशी अनुभूति होते!