A Whisper of Nature -नैनीताल, पंगोट आणि जीम कॉर्बेट

आदि कैलास यात्रेनंतरची ही निवांत सहल — नैनीतालच्या मॉल रोडवरील गजबजाटापलीकडील मनोरा पीकची शांतता, किलबरी-पंगोटच्या हिरव्यागार जंगलवाटा, पक्ष्यांची किलबिल आणि जीम कॉर्बेटच्या सफारीचे रोमांचक क्षण म्हणजे खऱ्या अर्थी - A Whisper of Nature! निसर्ग, विज्ञान, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि जंगल सफारी ह्यांच्या संमिश्र अनुभवाने उन्हाळी सुट्टी संस्मरणीय झाली.

दुर्गम कुमाऊंमधील दारमा व्हॅली

कुमाऊं प्रदेशातील अत्यंत दुर्गम भागात दारमा व्हॅलीसारखी नितांत निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असलेली अनेक सुंदर ठिकाणे आहेत. अत्यंत दुर्गम भागात असल्याने अद्यापही बहुतांशी लोकांना ही ठिकाणे अवगत नाहीत. पिथौरागढ जिल्ह्यात कुमाऊं हिमालयाच्या पूर्वेकडील कोपर्‍यात दोन पर्वतरांगांनी विभागलेल्या खोऱ्यांमध्ये ‘दारमा व्हॅली’ पसरलेली आहे. दारमा व्हॅलीचे प्रमुख आकर्षण म्हणजे पंचाचुली पर्वत शिखरे!

आदि कैलास – ॐ पर्वत यात्रा – भाग २

आदि कैलास आणि ॐ पर्वत ही केवळ हिमालयातील भव्य शिखरे नाहीत; ती अशी पवित्र स्थाने आहेत, जिथे निसर्ग स्वत:च शिवतत्त्वाचे साकार दर्शन घडवतो. आदि कैलास पर्वताच्या छायेत शांत उभं राहिल्यावर जाणवतं—शिव दूर कुठे नाही; तो इथेच आहे, या गिरीकंदरांमध्ये, ह्या आसमंतामध्ये, इथे वाहणार्‍या वाऱ्यात, इथल्या निळ्या आकाशात, आणि आपल्या श्वासाच्या लयीत! ॐ पर्वताच्या सान्निध्यात, नाबी डांगच्या नीरव शांततेत निसर्ग ध्यानस्थ होऊन मंत्रोच्चार करत त्या पर्वत शिखरावर ॐ रेखाटत आहे आणि त्याचा सूक्ष्म नाद कानात गुंजत आहे अशी अनुभूति होते!

आदि कैलाश – ॐ पर्वत यात्रा भाग – १

भारताच्या उत्तराखंड राज्यातील पिथौरागढ जिल्ह्यात हिमालयीन पर्वतरांगेत स्थित आदि कैलास किंवा ‘छोटा कैलाश’ म्हणजे तिबेटमध्ये असलेल्या कैलास पर्वतशिखराचे प्रतिरूप! पंच कैलाशांपैकी एक “आदि कैलाश”!

जागेश्वर मंदिर समूह

घनदाट देवदार वृक्षाच्या जंगलांनी वेढलेल्या हिरव्यागार टेकड्यांच्या परिसरात वर्षभर सुखद हवामानाचा वरदहस्त असलेले एक प्रसिद्ध आणि प्राचीन तीर्थस्थळ म्हणजे - जागेश्वर धाम! इथे भगवान शिवाला समर्पित १२५ पेक्षा अधिक प्राचीन दगडी मंदिराचे दोन ऐतिहासिक समूह आहेत. ही मंदिरे म्हणजे दगडात कोरलेली एक अखंड शिवनगरी जणू! ही मंदिरे त्या निसर्गरम्य वातावरणात त्यांच्या रचनेतून भारताच्या समृद्ध स्थापत्य कलेची अद्वितीय परंपरा आपल्यासमोर उलगडतात.

आठवणीतले नैनीताल

एप्रिल १९९७ च्या नैनीताल सहलीची आठवण आजही मनात ताजी आहे. हिमालयीन हवेची सुखद झुळूक, डोंगररांगांच्या कुशीतून चमकणाऱ्या चांदण्या, आणि सकाळी बाल्कनीतून दिसणारे शांत नैनी सरोवर—सगळेच जादुई! गुलाबी थंडीत आयता चहाचा कप आणि जोडीला निसर्गाचा देखावा! हे क्षण आजही बंद पापण्यांसमोर नैनीतालच्या हिमालयीन सौंदर्याची आठवण करून देतात. नैनीलेकवरील बोटींग, स्नो-व्ह्यू पॉइंटची सफर, आणि मॉल रोडवरील संध्याकाळचा फेरफटका—नैनीताल म्हणजे खरोखर कुमाऊंची राणी! .

उत्तराखंडचे मिनी स्वित्झर्लंड

उत्तराखंड राज्य निसर्ग सौंदर्याने पुरेपूर नटलेले आहे. उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात नैसर्गिक सौंदर्याने नटलेले एक हिल स्टेशन आहे- हर्षिल! बर्फाच्छादित पर्वत, पाईन वृक्षांची जंगले, सफरचंदांच्या बागा, प्राचीन मंदिरे, पारंपारिक लाकडी घरे हयांनी नटलेले हर्षिल, उत्तराखंड मधील “मिनी स्वित्झर्लंड” म्हणूनही ओळखले जाते.

गरतांग गली

उत्तरकाशी जिल्ह्यातील नेलोंग व्हॅलीतील उंच डोंगर-कपारीमध्ये असलेला हा ऐतिहासिक लाकडी पूल, “गरतांग  गली” म्हणून प्रसिद्ध आहे. निखळ डोंगर खडकांमध्ये कोरून बनवलेला हा पूल म्हणजे अभियांत्रिकी आणि सांस्कृतिक वारसाचा एक उल्लेखनीय नमूना आहे. जणू डोंगराच्या पोटात पोखरून तरंगता पूल बनवलेला आहे! हा छोटासा ट्रेक जितका थरारक आहे तितकाच निसर्गरम्य!

गौमुख – तपोवन

गौमुख-तपोवनाकडे जाताना अगदी रूक्ष, खडकाळ वाटणारा हा प्रदेश, परतीच्या प्रवासात मात्र गंगा अवतरणाच्या पौराणिक कथेचा रंगमंच भासू लागला. विधात्याने निसर्गाचे नेपथ्य इतके बेमालूम निर्माण केलेले होते की, गंगा अवतरणाच्या कथेचा प्रत्येक प्रसंग खरा वाटावा! शिवलिंग पर्वत स्वरूप महादेव आणि तिथून उत्पन्न होणारी आकाशगंगा! गौमुखातून उगम पावणारी भागीरथी! त्या गूढ शांततेचा आणि हिमाच्छादित पर्वत शिखरांनी वेढलेला सामान्यतः रुक्ष वाटणारा प्रदेशही सुंदर वाटू लागतो. पौराणिक दंतकथेने मनावर गारुड करून संमोहित केल्यासारखी भावना होऊ लागली! ट्रेकचा बहुतांशी टप्पा हा अगदी रांगड्या वाटणाऱ्या निसर्गाशी थेट भेट घडवून आणणारा आहे. प्राचीन पौराणिक कथेशी संदर्भ जोडणाऱ्या हिमशिखरांनी सजलेल्या चौफेर वेढलेल्या पर्वत रांगा गूढ रहस्य दडविल्यागत आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या असतात आणि अवघा गौमुख तपोवनाचा मार्ग आपल्याला प्राचीन दंतकथा आणि जादुई सौंदर्याचा ट्रेक भासू लागतो!

हर की दून – महादेवाच्या भूमीत!

हर की धून म्हणजे गिरी-राजशृंगी महादेवाचे व प्रकृती पार्वती-सतीचे मिलन! इथे आल्यावर असे वाटते की, हिमालयाचा विराट देह धारण करून पार्वती परमेश्वर दर्शनेच्छुंना विस्मय, भय अश्या दृष्यांची भेट घडवून संमिश्र आनंदाच्या उर्मीनी परिपूर्ण करीत आहेत. हिमालय जितका मनोरम तितकाच भयावह! हया परस्परविरोधी भावांचा एकत्र समावेश शिव-गौरीच्या हिमालयरूपी विराट देहातच प्रकट झालेला दिसून येतो.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑