सफर उत्तरबंगाची – भाग -२

पश्चिम बंगाल राज्याच्या कॅलिंगपोंग, जलपाईगुडी, अलीपुरद्वार, कूचबिहार या जिल्ह्यांमध्ये विस्तीर्ण पसरलेला दुआर्स प्रदेश विशेष करून वन्यजीव अभयारण्य आणि निसर्गरम्य प्रदेशसाठी प्रसिद्ध आहे. घनदाट जंगले, चहाच्या बागा, अभयारण्ये आणि जैवविविधतेची विपुलता हीच खरी दुआर्सची ओळख! जंगल भटकंती, नदी किनारी व्यतीत केलेली शांत संध्याकाळ किंवा जंगल वाटांचा थरार यांचा एकत्रित अनुभव देणारी निवांत सहल म्हणजे दुआर्स! दुआर्स प्रांतातील लतागुडीच्या मुक्कामामध्ये म्हैसगाडीतून जंगलाच्या दिशेने केलेला प्रवास, मेधला टॉवरवरून घेतलेला निसर्गाचा वेध, विविध प्राणी-पक्षी पाहण्याचा आनंद कातरवेळी जंगलात व्यतीत केलेले क्षण, आणि परतीच्या वाटेवर अनुभवलेले संथाळ आदिवासी लोकनृत्य—ह्या प्रत्येक गोष्टीने दुआर्स सहलीत वेगळीच रंगत आणली.

सफर उत्तरबंगाची – भाग – १

उत्तरेस नेपाळ, भूतान आणि सिक्किमच्या सीमा, पश्चिमेला बिहार, ओरिसा तर पूर्वेस आसाम आणि बांगला देशाची सीमा अश्या अत्यंत गुंतागुंतीची सीमा असलेले गंगा - ब्रह्मपुत्रा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात वसलेले हे पश्चिम बंगाल राज्य! ढोबळ मानाने हिमालय आणि बंगाल उपसागराच्या दरम्यान असलेला हा प्रदेश. त्याच्या उत्तरेस दार्जिलिंग, जलपाईगुडी, कूचबिहार, मालदा, उत्तर आणि दक्षिण दीनाजपुर, अलिपुरद्वार आणि कॅलिंगपोंग ह्या जिल्ह्यानी मिळून तयार होतो, “नॉर्थ बंगाल” अर्थातच उत्तरबंगा! उत्तरबंगाच्या पहिल्या भागात सफर - कुचबिहारची!

Create a website or blog at WordPress.com

Up ↑