ज्यांना खरोखरच निसर्गात रममाण होण्यास आवडतं, निसर्गाच्या हिरवाईशी, विविधतेशी सुसंवाद साधावा असे वाटते त्यांच्यासाठी हिमालयातील पदभ्रमण मोहीमा म्हणजे एक पर्वणीच आहे. हिमालयामध्ये प्रसिद्धीच्या झोतात नसलेली अशी अनेक ठिकाणं आहेत जी आपला ऐतिहासिक, पौराणिक वारसा आणि सृष्टी सौंदर्य वर्षानुवर्षे जपत आली आहेत आणि जी भटकंती करणार्यांना खुणावत आहेत. साद देती हिमशिखरे ह्या सदरामध्ये हिमालयात केलेली भटकंती आणि पदभ्रमण मोहिमांमध्ये घेतलेल्या स्वानुभवांचे शब्दांकन आहे. ज्यांना पर्यटन, ट्रेकिंग ह्याची आवड आहे, तसेच हिमालयाची ओढ आहे, त्यांना हे अनुभव कथन वाचण्यास नक्की आवडेल.
गरतांग गली
उत्तरकाशी जिल्ह्यातील नेलोंग व्हॅलीतील उंच डोंगर-कपारीमध्ये असलेला हा ऐतिहासिक लाकडी पूल, “गरतांग गली” म्हणून प्रसिद्ध आहे. निखळ डोंगर खडकांमध्ये कोरून बनवलेला हा पूल म्हणजे अभियांत्रिकी…
पुढे वाचागौमुख – तपोवन
गौमुख-तपोवनाकडे जाताना अगदी रूक्ष, खडकाळ वाटणारा हा प्रदेश, परतीच्या प्रवासात मात्र गंगा अवतरणाच्या पौराणिक कथेचा रंगमंच भासू लागला. विधात्याने निसर्गाचे नेपथ्य इतके बेमालूम निर्माण केलेले…
पुढे वाचारम्य सरोवरांच्या प्रदेशात – अंतिम भाग
काश्मीर ग्रेट लेकचा ट्रेक हा एकमेव असा ट्रेक आहे की, ज्यामध्ये आपल्याला निचनाईपास, गडसर पास आणि झजपास ह्या तीन उंच खिंडी आव्हान देत उभ्या ठाकलेल्या…
पुढे वाचारम्य सरोवरांच्या प्रदेशात- भाग ७
हिरव्यागार कुरणामधून धुक्याचा गडद अंचल ओढून लाजत मुरडत जणू अवनी आमच्या स्वागतास अवतरली होती. सातसार कॅम्पहून निघाल्यापासूनची चढउतारांवर झालेली दमछाक पार नाहीशी झाली. अतिशय विलक्षण…
पुढे वाचारम्य सरोवरांच्या प्रदेशात – भाग ६
पावलोपावली बालकवींची कविता जिवंत झाली होती! “हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे – त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती”. हिरवळीमधून जाणाऱ्या पायवाटा आणि…
पुढे वाचारम्य सरोवरांच्या प्रदेशात – भाग ५
गडसर खिंडीमध्ये पोहोचताच निसर्ग चित्रांचे जणू एक भव्य दालनच आपल्या पुढे उघडले आहे असे वाटू लागते. दोन्ही जुळ्या सरोवरांचे एकत्रित दर्शन भव्य दिव्य वाटते. इतक्या…
पुढे वाचारम्य सरोवरांच्या प्रदेशात – भाग ४
उंच आकाशाकडे नजर करताच कायम बर्फाच्छादित राहिल्यामुळे पार बोडक्या दिसणार्या कातीव कडेकपारी, त्यांच्या अंगाखांदयांवर झुलणारे हिम! आणि त्यांच्या पायाशी लडिवाळ नाद करीत प्रवाही झालेले झरे…
पुढे वाचारम्य सरोवरांच्या प्रदेशात – भाग ३
आम्ही हिरव्यागार हरित तृणांच्या मखमालीने नटून थटून आमच्या स्वागतास सज्ज असलेल्या नागमोडी वळणे असलेल्या डोंगर उतारांवरुन पुढे चालू लागलो. जसजसे पुढे जात होत होतो तसतसे…
पुढे वाचारम्य सरोवरांच्या प्रदेशात – भाग २
सर्व दूर पसरलेली पाचूच्या रंगाची कुरणे, देवदार वृक्षांची जंगले आणि चंदेरी हिमाने नटलेली पर्वत शिखरे!
पुढे वाचारम्य सरोवरांच्या प्रदेशात
पृथ्वी तलावर कुठे स्वर्गातील नयनरम्य असे नंदनवन असेल तर ते कश्मीर मध्येच वसलेले आहे! आणि हे नंदनवन जर अगदी खरोखर अनुभवायचे असेल तर कश्मिरच्या निसर्गरम्य…
पुढे वाचाहर की दून – महादेवाच्या भूमीत!
हर की धून म्हणजे गिरी-राजशृंगी महादेवाचे व प्रकृती पार्वती-सतीचे मिलन! इथे आल्यावर असे वाटते की, हिमालयाचा विराट देह धारण करून पार्वती परमेश्वर दर्शनेच्छुंना विस्मय, भय…
पुढे वाचा