नमस्कार वाचकहो,
‘हिमालयातील अनवट वाटा’ हे माझे पहिलेवहिले पुस्तक नोशन प्रेस पब्लिकेशन्सद्वारा प्रकाशित झाले आहे. ‘हिमालयातील अनवट वाटा’ हे पुस्तक म्हणजे हिमाचल प्रदेश, गढवाल, कुमाऊ, पूर्व हिमालय ह्या प्रदेशांमध्ये दुर्गम हिमालयात मी केलेल्या पाच पदभ्रमण मोहिमांमध्ये घेतलेल्या स्वानुभवांचे शब्दांकन आहे. ज्यांना पर्यटन, ट्रेकिंग ह्याची आवड आहे, तसेच हिमालयाची ओढ आहे, त्यांना हे अनुभव कथन वाचण्यास नक्की आवडेल.
‘हिमालयातील अनवट वाटा’ नोशन प्रेसच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तसेच अमेझोन, फ्लिपकार्ट ह्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. आपण पुस्तक ऑनलाइन ऑर्डर करू शकता. आपण पुस्तक वाचून आपला अभिप्राय जरूर नोंदवा. त्यामुळे अधिकाधिक लिहिण्याची ऊर्जा मिळेल.
धन्यवाद



दुर्गम हिमालयातील पहिले पाऊल – सारपास!
पाच तासांच्या सलग, अविश्रांत, अथक चढाई नंतर ज्या ठिकाणी पोहोचलो ते दृश्य आनंददायी होतं! चार दिवस अथक रानावनातून, डोंगरदऱ्यांच्या अंगाखांदयावरून केलेल्या पायपीटीचे बक्षीस जणू! सभोवतालची हिमाच्छादीत शिखरे म्हणजे देवाजीच्या साम्राज्यातील प्रशस्त दरबार जणू! सारपास खिंडीच्या तोंडापाशी जणू बर्फाचे कुरण पसरलेले!

पिंडारीच्या वाटेवर
कुंमांऊ हिमालयामधील उंचीवर स्थित असणाऱ्या परंतू पाऊलवाटेने ग्लेशिअर्स पर्यंत पोहोचू शकणाऱ्या शिखरांपैकी एक – पिंडारी ग्लेशिअर्स! पिंडारी ग्लेशिअर्स म्हणजे ‘पिंडारी नदीचे उगम स्थान! नंदादेवी पार्कच्या दक्षिण-पश्चिम बाजूला बाहेरच्या बाजूकडील उतारांना स्पर्श करणारे पिंडारी!

पुष्पावतीचे खोरे
उत्तराखंड मधील गढवाल हिमालयाच्या चमोली आणि पिथौरागढ जिल्ह्यामध्ये येणारा आणि श्री बद्रिनाथाजवळ असणारा नंदादेवी संरक्षित वनांचा हा परिसर- ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ – फुलों की घाटी अथवा पुष्पावतीचे खोरे! नंदादेवी राष्ट्रीय उदयानाच्या उत्तर पश्चिमेला पुष्पावती नदीच्या खोऱ्यात समुद्र सपाटीपासून ३६५८ मीटर्स उंचीवर भ्युंदर खोऱ्या च्या शिखरांवर झूल पांघरल्यागत दूरवर फुलांची घाटी विस्तारलेली आहे.
Himalayatil Anwat Wata (हिमालयातील अनवट वाटा) is exhilarating true, self-experienced trekking tales. This book consists of five chapters on five different treks done in Himachal Pradesh, Garhwal, Kumaon and Eastern Himalayas. In this memoir, Leena chronicles her journey on treks that was inspirational for her. Himalayatil Anwat Wata takes readers with them as they enter realms of desolate but serene nature in Himalayan valleys, tranquil forests and reader would feel that they are wandering along the author on those trails itself.
