हर की धून म्हणजे गिरी-राजशृंगी महादेवाचे व प्रकृती पार्वती-सतीचे मिलन! इथे आल्यावर असे वाटते की, हिमालयाचा विराट देह धारण करून पार्वती परमेश्वर दर्शनेच्छुंना विस्मय, भय अश्या दृष्यांची भेट घडवून संमिश्र आनंदाच्या उर्मीनी परिपूर्ण करीत आहेत. हिमालय जितका मनोरम तितकाच भयावह! हया परस्परविरोधी भावांचा एकत्र समावेश शिव-गौरीच्या हिमालयरूपी विराट देहातच प्रकट झालेला दिसून येतो.