रातराणी फुलली, कळी कळी खुलली रूप गंधाने सजली, रोम रोम मोहोरली मनी माझ्या फुलली, फूल होऊन डोलली चाहूल ही पावलांची, साद कुणी घातलेली आज पुनव हासरी, नभी नभी फाकली चांदण्याच्या स्पर्शाने, तनु तनु हरखली लक्ष लक्ष डोळ्यांनी मी, वाट तुझी पाहिलेली पापण्यांच्या बांधावरती, आसवे ही विसावली तेच श्वास आभासाचे, गाती गाणे विरहाचे विरले हवेत पडसाद, साद मी घातलेली
Discover more from अनवट वाटा
Subscribe to get the latest posts sent to your email.
यावर आपले मत नोंदवा