दुर्ग कलावंतीण

मुंबई-पुणे महामार्गावरून जाताना डाव्या हाताला इंग्रजी “व्ही” आकार धारण करणाऱ्या ह्या पर्वत रांगांची नजरभेट किती वेळा झाली असेल ह्याची मोजदाद नाही. पुण्याला अथवा खालापूर-कर्जतकडे जाताना असंख्यवेळा ह्या डोंगररांगा नजरेला भिडलेल्या! पावसाळ्यात हिरवाईने नटलेल्या, तर एरवी करड्या रंगाची प्रावरणे धारण करून सदैव ठाम उभ्या असलेल्या ह्या पर्वतरांगा परिचयाच्या होत्या खऱ्या! परंतु हया पर्वतरांगामध्ये ‘दुर्ग’ म्हणण्या इतके सह्याद्री वैभव दडलेले असेल ह्याची अजिबात कल्पना नव्हती. कलावंतीण दुर्ग म्हणजे महाराष्ट्रातील पश्चिम घाटात सह्याद्री पर्वतरांगांमध्ये, रायगड जिल्ह्यामधील पनवेलच्या पूर्वेला मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून माथेरानच्या डोंगररांगामध्ये दिसणारे, समुद्र सपाटीपासून अंदाजे २२५० फूट उंचीचे एक छोटे शिखर!

Create a website or blog at WordPress.com

Up ↑