गरतांग गली

उत्तरकाशी जिल्ह्यातील नेलोंग व्हॅलीतील उंच डोंगर-कपारीमध्ये असलेला हा ऐतिहासिक लाकडी पूल, “गरतांग  गली” म्हणून प्रसिद्ध आहे. निखळ डोंगर खडकांमध्ये कोरून बनवलेला हा पूल म्हणजे अभियांत्रिकी आणि सांस्कृतिक वारसाचा एक उल्लेखनीय नमूना आहे. जणू डोंगराच्या पोटात पोखरून तरंगता पूल बनवलेला आहे! हा छोटासा ट्रेक जितका थरारक आहे तितकाच निसर्गरम्य!

गौमुख – तपोवन

गौमुख-तपोवनाकडे जाताना अगदी रूक्ष, खडकाळ वाटणारा हा प्रदेश, परतीच्या प्रवासात मात्र गंगा अवतरणाच्या पौराणिक कथेचा रंगमंच भासू लागला. विधात्याने निसर्गाचे नेपथ्य इतके बेमालूम निर्माण केलेले होते की, गंगा अवतरणाच्या कथेचा प्रत्येक प्रसंग खरा वाटावा! शिवलिंग पर्वत स्वरूप महादेव आणि तिथून उत्पन्न होणारी आकाशगंगा! गौमुखातून उगम पावणारी भागीरथी! त्या गूढ शांततेचा आणि हिमाच्छादित पर्वत शिखरांनी वेढलेला सामान्यतः रुक्ष वाटणारा प्रदेशही सुंदर वाटू लागतो. पौराणिक दंतकथेने मनावर गारुड करून संमोहित केल्यासारखी भावना होऊ लागली! ट्रेकचा बहुतांशी टप्पा हा अगदी रांगड्या वाटणाऱ्या निसर्गाशी थेट भेट घडवून आणणारा आहे. प्राचीन पौराणिक कथेशी संदर्भ जोडणाऱ्या हिमशिखरांनी सजलेल्या चौफेर वेढलेल्या पर्वत रांगा गूढ रहस्य दडविल्यागत आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या असतात आणि अवघा गौमुख तपोवनाचा मार्ग आपल्याला प्राचीन दंतकथा आणि जादुई सौंदर्याचा ट्रेक भासू लागतो!

हिमाचलचे निसर्ग वैभव – तीर्थन आणि सेंज व्हॅली!

कुल्लू जिल्ह्यामध्ये दुर्गम हिमाचलामध्ये जणू दडून बसलेली तीर्थन व्हॅली, जीभी व्हॅली आणि सेंज व्हॅली ही खोरी निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण आहेत. विस्तीर्ण पसरलेली मखमली कुरणे, त्यांच्या सभोवताल, कोनिफरस वृक्षांची लगट! एका मागोमाग हिरवट, निळसर आणि करड्या होत जाणाऱ्या डोंगर रांगा! आणि त्यांच्या मागे दंतूर पंक्तिसारख्या डोकावणाऱ्या हिमाच्छादित पर्वतरांगा! निळ्या आकाशी पांढऱ्या, भुरक्या, करड्या तर कधी गडद निळ्या ढगांचा चालणारा खेळ आणि त्यांच्या त्या पर्वतरांगांवर झुलणाऱ्या सावल्या! सारं काही अगदी अद्भुत आणि परिकथेतील गोष्टी सारखं!

पृष्ठे: 1 2 3 4

रम्य सरोवरांच्या प्रदेशात – अंतिम भाग

काश्मीर ग्रेट लेकचा ट्रेक हा एकमेव असा ट्रेक आहे की, ज्यामध्ये आपल्याला निचनाईपास, गडसर पास आणि झजपास ह्या तीन उंच खिंडी आव्हान देत उभ्या ठाकलेल्या असतात, तर ट्रेक रुटवर पाच नदयांच्या खोऱ्यांमधले  सात विलक्षण सुंदर अल्पाईन तलाव आणि त्याच्या परिसरामध्ये नंदनवनात असल्याचा भास देणारी रंगीबेरंगी जंगली फुले हिरव्या मिडोजवर पसरलेली असतात. हिरवीगार कुरणे असो अथवा खडबडीत पर्वत रांगा, त्यांच्या अंगा-खांदयांवरुन खुशाल विहार करणारे निर्झर किंवा निचनाई पास पार करून गेल्यावर गडसर पासकडे जाण्यापूर्वी आणि नंतर दिसणारी हिरवट निळ्या आणि फिरोजी रंगांचे अविष्कार दाखवणारी अल्पाईन सरोवरे असो! सर्वांत विलक्षण गोष्ट म्हणजे ह्या रम्य सरोवरांच्या प्रदेशातील ट्रेकची सांगता हरमुख पर्वताच्या पायथ्याशी वास्तव्य करून होते! ट्रेकचा प्रत्येक दिवस खरोखरच पोस्टकार्डवरील चित्राप्रमाणे परिपूर्ण असतो. काश्मीरला पृथ्वी वरील स्वर्ग का म्हणतात हयाचा प्रत्यक्ष प्रत्यय देणारा ट्रेक म्हणजे ‘काश्मीर ग्रेट लेकस्’ ट्रेक!

पृष्ठे: 1 2

रम्य सरोवरांच्या प्रदेशात- भाग ७

हिरव्यागार कुरणामधून धुक्याचा गडद अंचल ओढून लाजत मुरडत जणू अवनी आमच्या स्वागतास अवतरली होती. सातसार कॅम्पहून निघाल्यापासूनची चढउतारांवर झालेली दमछाक पार नाहीशी झाली. अतिशय विलक्षण सुंदर निसर्गाचा आविष्कार होता! आम्ही क्षणभर ‘गंगाबल’ सरोवराचा नजारा पाहून पाऊले आमच्या अगदी हाकेच्या टप्प्यात असणाऱ्या कॅम्पसाईटकडे वळविली. काही अंतर पुढे जाताच दृष्टीस पडले ‘नंदखोल’ सरोवर! ही जुळी सरोवरे अद्भुत निसर्ग सौंदर्याने अगदी हया हिमालयीन पर्वत रांगांच्या कुशीत स्वर्गीय सौंदर्याची अनुभूति देण्यासाठी विराजित होती जणू! त्यांचा पाठीराखा ‘हरमुख पर्वत’ काश्मीरी पंडितांसाठी अत्यंत पवित्र आणि धार्मिक महत्त्व असलेले स्थान! अमरनाथ गुंफेच्या व्यतिरिक्त भगवान शंकराशी निगडीत असलेलं काश्मीर खोऱ्यामधलं अजून एक ‘भक्ती स्थान’! हरमुख!

रम्य सरोवरांच्या प्रदेशात – भाग ६

पावलोपावली बालकवींची कविता जिवंत झाली होती! “हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे – त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती”. हिरवळीमधून जाणाऱ्या पायवाटा आणि स्वागतोत्सुक रंगीबेरंगी फुलांचे विखुरलेले गालिचे! उजव्या बाजूला पंजे रोवून उभे असल्यागत खडे पहाड आणि पायथ्याशी वाहणाऱ्या हिमनदया, त्यांच्या पासून निर्माण झालेल्या निर्झरांचे त्या दरी-खोऱ्यांमध्ये चालू असलेले अखंड पखवाज वादन, आणि आम्ही अगदी उंचीवर असूनही कानी पडणारे त्यांचे ध्रुपद-धमार! हिरवळीवर मुक्तपणे विहार करत खुशाल चरणारे पश्मीना मेंढ्यांचे कळप आणि निवांत त्यांच्या मागे असणारे बकरवाल! डोळे अगदी ३६० अंशाच्या कोनामध्ये फिरले तर स्तब्ध आणि थक्क करणारी निसर्ग चित्रे!

रम्य सरोवरांच्या प्रदेशात – भाग ५

गडसर खिंडीमध्ये पोहोचताच निसर्ग चित्रांचे जणू एक भव्य दालनच आपल्या पुढे उघडले आहे असे वाटू लागते. दोन्ही जुळ्या सरोवरांचे एकत्रित दर्शन भव्य दिव्य वाटते. इतक्या उंचीवर दुर्गम पर्वतरांगांमध्ये दडलेले हे निसर्ग वैभव आणि त्याच्या भव्यतेचा आविष्कार वेगळ्याच अनुभूति देऊन जातो.

रम्य सरोवरांच्या प्रदेशात – भाग ४

उंच आकाशाकडे नजर करताच कायम बर्फाच्छादित राहिल्यामुळे पार बोडक्या दिसणार्‍या कातीव कडेकपारी, त्यांच्या अंगाखांदयांवर झुलणारे हिम! आणि त्यांच्या पायाशी लडिवाळ नाद करीत प्रवाही झालेले झरे आणि मग त्यांच्या कुशीमध्ये जागोजाग पसरलेले हिरवळीचे गालिचे!

रम्य सरोवरांच्या प्रदेशात – भाग ३

आम्ही हिरव्यागार हरित तृणांच्या मखमालीने नटून थटून आमच्या स्वागतास सज्ज असलेल्या नागमोडी वळणे असलेल्या डोंगर उतारांवरुन पुढे चालू लागलो. जसजसे पुढे जात होत होतो तसतसे उंचीचे माप वाढत होते. मागे वळून पाहता विस्तीर्ण खोऱ्यात सोनामर्ग गाव आणि ताजिवास ग्लेशियर दिसत होते. त्याच्या पलीकडे दूर एकमेकांत पाय गुंतवून उभे असलेले ‘बलतल’ जवळचे पहाड दिसत होते. आणि त्याही पलीकडे ‘बर्फानी बाबा’ अमरनाथ पहाडाच्या गुंफेत हया वर्षी यात्रेकरूंच्या कोलाहलाविना ध्यानस्थ बसले असावेत!

रम्य सरोवरांच्या प्रदेशात – भाग २

सर्व दूर पसरलेली पाचूच्या रंगाची कुरणे, देवदार वृक्षांची जंगले आणि चंदेरी हिमाने नटलेली पर्वत शिखरे!

रम्य सरोवरांच्या प्रदेशात

पृथ्वी तलावर कुठे स्वर्गातील नयनरम्य असे नंदनवन असेल तर ते कश्मीर मध्येच वसलेले आहे! आणि हे नंदनवन जर अगदी खरोखर अनुभवायचे असेल तर कश्मिरच्या निसर्गरम्य दरी-खोऱ्यामध्ये भटकंती करायलाच हवी! हयाची प्रचीती कश्मीर खोऱ्यामध्ये विस्तीर्ण पसरलेल्या आणि अमर्याद निसर्ग सौंदर्याची उधळण झालेल्या हिमालयाच्या पर्वतरांगांमधून जाणारा “कश्मिर ग्रेट लेक”चा ट्रेक केल्यावर नक्कीच येते. असीम निसर्ग सौंदर्याचा वरदहस्त लाभलेल्या दरीखोऱ्या, रम्य अल्पाइन सरोवरे, त्यांच्या स्फटिकासम असणाऱ्या पाण्यामध्ये उमटलेल्या अनेक रंगछटा आणि सुविशाल हिमालय पर्वतांची छबी! सर्व काही मंत्रमुग्ध करणारं !

हर की दून – महादेवाच्या भूमीत!

हर की धून म्हणजे गिरी-राजशृंगी महादेवाचे व प्रकृती पार्वती-सतीचे मिलन! इथे आल्यावर असे वाटते की, हिमालयाचा विराट देह धारण करून पार्वती परमेश्वर दर्शनेच्छुंना विस्मय, भय अश्या दृष्यांची भेट घडवून संमिश्र आनंदाच्या उर्मीनी परिपूर्ण करीत आहेत. हिमालय जितका मनोरम तितकाच भयावह! हया परस्परविरोधी भावांचा एकत्र समावेश शिव-गौरीच्या हिमालयरूपी विराट देहातच प्रकट झालेला दिसून येतो.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑