कांचनजंगा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य गंगटोक हे आधुनिकता आणि निसर्ग ह्या दोन्हींचे अनोखे मिश्रण आहे. हिमाच्छादित पर्वतशिखरांचे दर्शन, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करणारे बौद्ध विहार, सर्व दूर फडफडणारे रंगीबेरंगी प्रार्थना ध्वज, आधुनिकतेची झलक यामुळे गंगटोकची भटकंती एक आगळा वेगळा अनुभव देऊन जाते. एम.जी. रोडवरील नातळची संध्याकाळ, ताशी व्ह्यू पॉईंटवरून दिसणारे हिमालयाचे भव्य दर्शन आणि रुमटेक मठातील अध्यात्मिक शांतता – ह्यामुळे गंगटोकची नाताळ सफर अविस्मरणीय झाली!
सिक्कीम डायरीज् : भाग – ३
रावंगला आणि नामची - निसर्ग आणि संस्कृतीचा अनोखा अनुभव!
सिक्कीम डायरीज् : भाग – २
योकसुम म्हणजे सुंदर निसर्गासोबत अध्यात्मिक आणि ऐतिहासिक ओळख असणारे अत्यंत शांत आणि विलक्षण नयनरम्य गाव! योकसुम म्हणजे अस्मानाला गवसणी घालणाऱ्या गिरिशिखरांशी नजरेनेच गुजगोष्टी करत कांचनजंगा पर्वतांच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलांच्या दरवळामध्ये स्वत:ला हरवून जाणं! निसर्गरम्य योकसुमच्या नीरव शांततेत काळ मंदावल्यासारखा वाटतो. आपल्या शरीराला स्पर्शून जाणाऱ्या त्या हवेत प्राचीन राजांच्या कथा, थेट भगवंताला साद घालणारी प्रार्थना ध्वजांची फडफड, आणि सभोवार पर्वतांचे शाश्वत नृत्य आपल्या कानामध्ये गुंजत राहते!
सिक्कीम डायरीज् : भाग – १
भारताच्या ईशान्येला पूर्व हिमालयाच्या कुशीत अगदी आपले वेगळेपण राखून असणारे आणि भारताच्या सर्वात लहान राज्यांमध्ये दुसरा क्रमांक असणारे राज्य म्हणजे सिक्कीम! समुद्र सपाटीपासून ७०५० फूट उंचीवर असलेल्या ग्यालशिंग शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर एक लहान निसर्ग सौंदर्याने नखशिखांत नटलेले शहर वजा गाव म्हणजे पेलिंग! कांचनजंगेच्या थेट मनोरम दृष्टादृष्ट भेटीसाठी परिचित असलेले आणि सिक्किममधे होत असलेल्या अनेक पदभ्रमण मोहिमांचा पहिला टप्पा म्हणजे पेलिंग.
मिरीक – छोटेखानी निसर्गरम्य शहर
पश्चिम बंगालमधील लोकांसाठी दार्जिलिंग जिल्ह्यातील अगदी हिमालयाच्या पायथ्याशी असलेले जवळचे थंड हवेचे, खूप कोलाहल नसलेले एक नयनरम्य पर्यटन स्थळ म्हणजे – मिरिक! आल्हाददायक हवा, दूरवर नजरेस पडणाऱ्या शुभ्र हिमालयीन पर्वतरांगा, उंच टेकाडांवर पसरलेले चहाचे मळे आणि शांत वातावरणामुळे मिरिक हे एक निवांत सुट्टीचे ठिकाण आहे!
एक अविस्मरणीय अनुभव- ओरिसा, पश्चिम बंगाल आणि नेपाळ सहल
नमस्कार, पंचवीस वर्षापूर्वी केसरी टुर्स सोबत केलेल्या एका प्रवासाचे टिपण जाणीवपूर्वक जसेच्या तसे आज कोणताही फोटो न वापरता पोस्ट करीत आहे. तुम्हाला आवडले तर जरूर प्रतिक्रिया नमूद करा! गोष्ट आहे सन २००० च्या वर्षातली! नेहमी प्रमाणे कौटुंबिक सहलीची आखणी झालेली होती. हया सुट्टीचा कार्यक्रम काहीसा मोठा होता! मुंबईहून ओरिसा राज्यातील भूवनेश्वर,जगन्नाथपूरी, कोणार्क सूर्य मंदिर पाहून पश्चिम बंगाल मधील कलकत्ता-दार्जिलिंग मार्गे जायचं ठरलं होतं- एकमेव हिंदू राष्ट्राच्या भेटीसाठी - अर्थातच कांचनजंगेच्या कुशीतील-नेपाळ!
उत्तराखंडचे मिनी स्वित्झर्लंड
उत्तराखंड राज्य निसर्ग सौंदर्याने पुरेपूर नटलेले आहे. उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात नैसर्गिक सौंदर्याने नटलेले एक हिल स्टेशन आहे- हर्षिल! बर्फाच्छादित पर्वत, पाईन वृक्षांची जंगले, सफरचंदांच्या बागा, प्राचीन मंदिरे, पारंपारिक लाकडी घरे हयांनी नटलेले हर्षिल, उत्तराखंड मधील “मिनी स्वित्झर्लंड” म्हणूनही ओळखले जाते.
हिमाचलचे निसर्ग वैभव – तीर्थन आणि सेंज व्हॅली!
कुल्लू जिल्ह्यामध्ये दुर्गम हिमाचलामध्ये जणू दडून बसलेली तीर्थन व्हॅली, जीभी व्हॅली आणि सेंज व्हॅली ही खोरी निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण आहेत. विस्तीर्ण पसरलेली मखमली कुरणे, त्यांच्या सभोवताल, कोनिफरस वृक्षांची लगट! एका मागोमाग हिरवट, निळसर आणि करड्या होत जाणाऱ्या डोंगर रांगा! आणि त्यांच्या मागे दंतूर पंक्तिसारख्या डोकावणाऱ्या हिमाच्छादित पर्वतरांगा! निळ्या आकाशी पांढऱ्या, भुरक्या, करड्या तर कधी गडद निळ्या ढगांचा चालणारा खेळ आणि त्यांच्या त्या पर्वतरांगांवर झुलणाऱ्या सावल्या! सारं काही अगदी अद्भुत आणि परिकथेतील गोष्टी सारखं!
यात्रा केदारखंडाची
महाकवी कालिदासाने हिमालयाला देवतात्मा अशी उपमा दिली आहे. अश्या ह्या देवतात्मा हिमालयाच्या कुशीत वसलेले उत्तराखंड राज्य! हिमालयाच्या पांच खंडामधील एक केदारखंड! हेच केदारखंड आज उत्तराखंड राज्यामधील गढवाल मंडल म्हणून परिचित आहे. ह्याच गढवाल भूमीत सुमेरु, सतोपंथ, गौरीपर्वत, गंधमादन, स्वर्गारोहिणी, केदारकंठा, बंदरपुंछ, नीलकंठ, चौखम्बा आदि पर्वतश्रेण्या आणि अनादि काळापासून भारतीय संस्कृतीला वंदनीय-पूजनीय असणारे, अखंड भारतवर्षाला सुजलाम-सुफलाम करत निरंतर प्रवाही असणारे गंगा-यमुनेचे जलप्रवाह! अनेकानेक तीर्थस्थळे, मनमोहक निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असणाऱ्या ह्या हिमालयात प्रवेश करताच खरोखर देवभूमीतच आल्याचा आभास होतो. गढवाल हिमालयात होणारी चारधाम यात्रा ही आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याची आणि हृदयाजवळची गोष्ट!
किल्ले हातगडसह सापुतारा
महाराष्ट्र हा खरं तर गडकिल्ल्यांचाच प्रदेश! नाशिक जिल्ह्यामध्ये सुरगणा नावाचे तालुक्याचे गाव आहे. सह्याद्रीच्या पूर्व भागातील “सातमाळ” पर्वतरांगांची सुरुवात ह्याच तालुक्यापासून होते. ह्याच रांगेच्या उपशाखेवर हा छोटासा किल्ला आहे – हातगड !
अरण्यस्पर्श
‘तुकाई टुरिझम’ हया पुण्याच्या पर्यटन संस्थेची जाहिरात वाचनात आली, आणि त्या जाहिरातीमधील एका वाक्याने मनावर चांगलंच गारूड केलं - जन्माला आल्यानंतर काही ठिकाणं पाहणं अपरिहार्य असतं! जाहिरात होती, हेमलकसा, ताडोबा आणि आनंदवनाच्या अभ्यास सहलीची! महाराष्ट्र, छत्तिसगड व आंध्रप्रदेश हयांच्या सीमेलगत खेटून आहे भामरागडचे दंडकारण्य! गडचिरोली जिल्ह्यात इंद्रावती, गोदावरी, वैनगंगा आणि प्राणहिता हया नद्यांनी वेढलेल्या परिसराच्या प्रदेशात आहे हेमलकसाचा ‘लोक बिरादरी’ प्रकल्प! पर्लकोटा, पामुलगौतमी आणि इंद्रावती नदयांच्या तीरावर श्वापदांप्रमाणे जगणाऱ्या जीवांना ‘माणूस’ म्हणून जगवण्याचे कार्य बाबा आमटेंनी ह्या भामरागडच्या हेमलकसाला सुरु केले. त्यांनी लावलेल्या समाजसेवेच्या रोपाचे रूपांतर आता मोठया वट वृक्षात झाले आहे. त्या वृक्षाच्या छायेत अनेक उपेक्षितांना सावली मिळत आहे.