महाराष्ट्र हा खरं तर गडकिल्ल्यांचाच प्रदेश! नाशिक जिल्ह्यामध्ये सुरगणा नावाचे तालुक्याचे गाव आहे. सह्याद्रीच्या पूर्व भागातील “सातमाळ” पर्वतरांगांची सुरुवात ह्याच तालुक्यापासून होते. ह्याच रांगेच्या उपशाखेवर हा छोटासा किल्ला आहे – हातगड !
अरण्यस्पर्श
‘तुकाई टुरिझम’ हया पुण्याच्या पर्यटन संस्थेची जाहिरात वाचनात आली, आणि त्या जाहिरातीमधील एका वाक्याने मनावर चांगलंच गारूड केलं - जन्माला आल्यानंतर काही ठिकाणं पाहणं अपरिहार्य असतं! जाहिरात होती, हेमलकसा, ताडोबा आणि आनंदवनाच्या अभ्यास सहलीची! महाराष्ट्र, छत्तिसगड व आंध्रप्रदेश हयांच्या सीमेलगत खेटून आहे भामरागडचे दंडकारण्य! गडचिरोली जिल्ह्यात इंद्रावती, गोदावरी, वैनगंगा आणि प्राणहिता हया नद्यांनी वेढलेल्या परिसराच्या प्रदेशात आहे हेमलकसाचा ‘लोक बिरादरी’ प्रकल्प! पर्लकोटा, पामुलगौतमी आणि इंद्रावती नदयांच्या तीरावर श्वापदांप्रमाणे जगणाऱ्या जीवांना ‘माणूस’ म्हणून जगवण्याचे कार्य बाबा आमटेंनी ह्या भामरागडच्या हेमलकसाला सुरु केले. त्यांनी लावलेल्या समाजसेवेच्या रोपाचे रूपांतर आता मोठया वट वृक्षात झाले आहे. त्या वृक्षाच्या छायेत अनेक उपेक्षितांना सावली मिळत आहे.
रम्य सरोवरांच्या प्रदेशात – अंतिम भाग
काश्मीर ग्रेट लेकचा ट्रेक हा एकमेव असा ट्रेक आहे की, ज्यामध्ये आपल्याला निचनाईपास, गडसर पास आणि झजपास ह्या तीन उंच खिंडी आव्हान देत उभ्या ठाकलेल्या असतात, तर ट्रेक रुटवर पाच नदयांच्या खोऱ्यांमधले सात विलक्षण सुंदर अल्पाईन तलाव आणि त्याच्या परिसरामध्ये नंदनवनात असल्याचा भास देणारी रंगीबेरंगी जंगली फुले हिरव्या मिडोजवर पसरलेली असतात. हिरवीगार कुरणे असो अथवा खडबडीत पर्वत रांगा, त्यांच्या अंगा-खांदयांवरुन खुशाल विहार करणारे निर्झर किंवा निचनाई पास पार करून गेल्यावर गडसर पासकडे जाण्यापूर्वी आणि नंतर दिसणारी हिरवट निळ्या आणि फिरोजी रंगांचे अविष्कार दाखवणारी अल्पाईन सरोवरे असो! सर्वांत विलक्षण गोष्ट म्हणजे ह्या रम्य सरोवरांच्या प्रदेशातील ट्रेकची सांगता हरमुख पर्वताच्या पायथ्याशी वास्तव्य करून होते! ट्रेकचा प्रत्येक दिवस खरोखरच पोस्टकार्डवरील चित्राप्रमाणे परिपूर्ण असतो. काश्मीरला पृथ्वी वरील स्वर्ग का म्हणतात हयाचा प्रत्यक्ष प्रत्यय देणारा ट्रेक म्हणजे ‘काश्मीर ग्रेट लेकस्’ ट्रेक!
रम्य सरोवरांच्या प्रदेशात- भाग ७
हिरव्यागार कुरणामधून धुक्याचा गडद अंचल ओढून लाजत मुरडत जणू अवनी आमच्या स्वागतास अवतरली होती. सातसार कॅम्पहून निघाल्यापासूनची चढउतारांवर झालेली दमछाक पार नाहीशी झाली. अतिशय विलक्षण सुंदर निसर्गाचा आविष्कार होता! आम्ही क्षणभर ‘गंगाबल’ सरोवराचा नजारा पाहून पाऊले आमच्या अगदी हाकेच्या टप्प्यात असणाऱ्या कॅम्पसाईटकडे वळविली. काही अंतर पुढे जाताच दृष्टीस पडले ‘नंदखोल’ सरोवर! ही जुळी सरोवरे अद्भुत निसर्ग सौंदर्याने अगदी हया हिमालयीन पर्वत रांगांच्या कुशीत स्वर्गीय सौंदर्याची अनुभूति देण्यासाठी विराजित होती जणू! त्यांचा पाठीराखा ‘हरमुख पर्वत’ काश्मीरी पंडितांसाठी अत्यंत पवित्र आणि धार्मिक महत्त्व असलेले स्थान! अमरनाथ गुंफेच्या व्यतिरिक्त भगवान शंकराशी निगडीत असलेलं काश्मीर खोऱ्यामधलं अजून एक ‘भक्ती स्थान’! हरमुख!
रम्य सरोवरांच्या प्रदेशात – भाग ६
पावलोपावली बालकवींची कविता जिवंत झाली होती! “हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे – त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती”. हिरवळीमधून जाणाऱ्या पायवाटा आणि स्वागतोत्सुक रंगीबेरंगी फुलांचे विखुरलेले गालिचे! उजव्या बाजूला पंजे रोवून उभे असल्यागत खडे पहाड आणि पायथ्याशी वाहणाऱ्या हिमनदया, त्यांच्या पासून निर्माण झालेल्या निर्झरांचे त्या दरी-खोऱ्यांमध्ये चालू असलेले अखंड पखवाज वादन, आणि आम्ही अगदी उंचीवर असूनही कानी पडणारे त्यांचे ध्रुपद-धमार! हिरवळीवर मुक्तपणे विहार करत खुशाल चरणारे पश्मीना मेंढ्यांचे कळप आणि निवांत त्यांच्या मागे असणारे बकरवाल! डोळे अगदी ३६० अंशाच्या कोनामध्ये फिरले तर स्तब्ध आणि थक्क करणारी निसर्ग चित्रे!
रम्य सरोवरांच्या प्रदेशात – भाग ५
गडसर खिंडीमध्ये पोहोचताच निसर्ग चित्रांचे जणू एक भव्य दालनच आपल्या पुढे उघडले आहे असे वाटू लागते. दोन्ही जुळ्या सरोवरांचे एकत्रित दर्शन भव्य दिव्य वाटते. इतक्या उंचीवर दुर्गम पर्वतरांगांमध्ये दडलेले हे निसर्ग वैभव आणि त्याच्या भव्यतेचा आविष्कार वेगळ्याच अनुभूति देऊन जातो.
रम्य सरोवरांच्या प्रदेशात – भाग ४
उंच आकाशाकडे नजर करताच कायम बर्फाच्छादित राहिल्यामुळे पार बोडक्या दिसणार्या कातीव कडेकपारी, त्यांच्या अंगाखांदयांवर झुलणारे हिम! आणि त्यांच्या पायाशी लडिवाळ नाद करीत प्रवाही झालेले झरे आणि मग त्यांच्या कुशीमध्ये जागोजाग पसरलेले हिरवळीचे गालिचे!
रम्य सरोवरांच्या प्रदेशात – भाग ३
आम्ही हिरव्यागार हरित तृणांच्या मखमालीने नटून थटून आमच्या स्वागतास सज्ज असलेल्या नागमोडी वळणे असलेल्या डोंगर उतारांवरुन पुढे चालू लागलो. जसजसे पुढे जात होत होतो तसतसे उंचीचे माप वाढत होते. मागे वळून पाहता विस्तीर्ण खोऱ्यात सोनामर्ग गाव आणि ताजिवास ग्लेशियर दिसत होते. त्याच्या पलीकडे दूर एकमेकांत पाय गुंतवून उभे असलेले ‘बलतल’ जवळचे पहाड दिसत होते. आणि त्याही पलीकडे ‘बर्फानी बाबा’ अमरनाथ पहाडाच्या गुंफेत हया वर्षी यात्रेकरूंच्या कोलाहलाविना ध्यानस्थ बसले असावेत!
रम्य सरोवरांच्या प्रदेशात – भाग २
सर्व दूर पसरलेली पाचूच्या रंगाची कुरणे, देवदार वृक्षांची जंगले आणि चंदेरी हिमाने नटलेली पर्वत शिखरे!
रम्य सरोवरांच्या प्रदेशात
पृथ्वी तलावर कुठे स्वर्गातील नयनरम्य असे नंदनवन असेल तर ते कश्मीर मध्येच वसलेले आहे! आणि हे नंदनवन जर अगदी खरोखर अनुभवायचे असेल तर कश्मिरच्या निसर्गरम्य दरी-खोऱ्यामध्ये भटकंती करायलाच हवी! हयाची प्रचीती कश्मीर खोऱ्यामध्ये विस्तीर्ण पसरलेल्या आणि अमर्याद निसर्ग सौंदर्याची उधळण झालेल्या हिमालयाच्या पर्वतरांगांमधून जाणारा “कश्मिर ग्रेट लेक”चा ट्रेक केल्यावर नक्कीच येते. असीम निसर्ग सौंदर्याचा वरदहस्त लाभलेल्या दरीखोऱ्या, रम्य अल्पाइन सरोवरे, त्यांच्या स्फटिकासम असणाऱ्या पाण्यामध्ये उमटलेल्या अनेक रंगछटा आणि सुविशाल हिमालय पर्वतांची छबी! सर्व काही मंत्रमुग्ध करणारं !
जय बर्फानी बाबा की!
पंचतरणीचा आसमंत अगदी चैतन्यस्वरूप वाटत होता. हयाच पंचतरणीपाशी महादेवाने पंचमहाभूताना त्यागले, तो परिसर एकाच वेळी आप, तेज, वायु आणि आकाश ह्यांची अनुभूति करून देत होता. निरभ्र आकाशात बर्फाच्छादित शिखरांवर पडलेली कोवळी सूर्यकिरणे विलोभनीय होती. पंचतरणीचे जल स्त्रोत त्या किरणांमुळे चमचमत होते. शीतल वायुलहरी पंचतरणीच्या खोऱ्यामध्ये खुशाल रेंगाळत होत्या.
हर की दून – महादेवाच्या भूमीत!
हर की धून म्हणजे गिरी-राजशृंगी महादेवाचे व प्रकृती पार्वती-सतीचे मिलन! इथे आल्यावर असे वाटते की, हिमालयाचा विराट देह धारण करून पार्वती परमेश्वर दर्शनेच्छुंना विस्मय, भय अश्या दृष्यांची भेट घडवून संमिश्र आनंदाच्या उर्मीनी परिपूर्ण करीत आहेत. हिमालय जितका मनोरम तितकाच भयावह! हया परस्परविरोधी भावांचा एकत्र समावेश शिव-गौरीच्या हिमालयरूपी विराट देहातच प्रकट झालेला दिसून येतो.