ध्यास

मला ज्याचा ध्यास आहे
 ध्येय त्याचे नाव आहे

साकारण्याची आस आहे
स्वप्न त्याचे नाम आहे 

प्रवासाला दिशेची नाव आहे
प्रकाश ज्याचा ठाव आहे 

असा हा प्रवास 
खळाळणाऱ्या सागराचा

 बाहू मजबूत करणाऱ्या 
अथांग आव्हानांचा  

तोच मला बळ देतो 
झेलण्यासाठी, पेलण्यासाठी 

तोच मला वाट दावितो
वावटळीतून ध्येयपूर्तीसाठी 

अन् एका क्षणी मी जाणलं
महात्म्य त्या महासागराचं 

प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस
आयुष्य नवनव्या साहसाचं! 


Discover more from अनवट वाटा

Subscribe to get the latest posts sent to your email.

One thought on “ध्यास

Add yours

Leave a reply to केतकी उत्तर रद्द करा.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑